Live Wire




एकदा माझी एक मैत्रिण घरी रहायला आली होती. त्या दिवशी मी सायीपासून तूप बनवायला घेतले होते. तिने ते पाहिले आणि एकदम कुतूहलाने मला विचारले हे तू काय करते आहेस? मी म्हटले सा
यीपासून तूप काढते आहे. ते कसे काढतात ग? मी तर कधीच पाहीले नाही मला सांग ना? असे म्हणाली आणि एकदम आवडीने मी कसे बनविते ते पहायला लागली.....

बनविताना जेव्हा मी लोणी धुवत होते तेव्हा तिला ते लोणी फार आवडले आणि ती म्हणाली 'लोण्यासारखे मृदू’ म्हणतात ते खरोखरच कीती सार्थक आहे याची जाणिव मला आज झाली.......

मग मी ठरविले चला प्रथम ’सायीपासून तूप बनविण्याच्या कृतीनेच सुरुवात करुया.

_______________________________________________

'सायीपासून तूप बनविणे'

एक डबा घेऊन रोज दुधावर येणारी साय त्यात काढून ठेवावी. मात्र हा डबा नेहमी फ्रिजरमध्येच ठेवावा.  साधारणत: आठ ते दहा दिवसांची साय एकत्र झाल्यावर रात्री डबा बाहेर काढून ठेवावा. सकाळी जेव्हा साय नॉर्मलला आलेली असेल तेव्हा त्या सायीला दही लावावे.

रात्री किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा सायीला दही व्यविस्थित लागून वर आलेले आहे हे पाहून ते एका मोठ्या पातेल्यात घ्यावे. एक मोठा(भाजीसाठी वापरतात तसा) चमचा(डाव) घेऊन १० ते १२ मिनिटे डाव्या आणि उजव्या बाजूने गोल फिरवावे. वर लोणी येताना दिसेल. प्रथम छोटे छोटे लोण्याचे भाग दिसतील नंतर हळू हळू ते मोठे होत जातील. जेव्हा लोण्याचा गोळा आणि ताक वेगळे दिसेल तेव्हा लोणी बनले असे समजावे.

त्या पातेल्यात थोडे पाणी टाकून चमच्याने ढवळून त्यातील ताक बाजूला काढून ठेवावे.(या ताकापासून फोडणीची कडी बनविता येते.) नंतर परत भरपूर पाणी टाकून लोणी स्वच्छ धूवून घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात ते लोणी घेऊन ते गॅसवर ठेवावे १५ ते २० मिनिटात लोण्यापासून साजूप तूप तयार होते. मध्ये मध्ये चमच्याने घोटाळत रहावे. ते तूप स्टीलच्या गाळणीतून गाळून घ्यावे आणि गाळणीत राहीलेला खवा(बेरी) साखर टाकून नुसता खायला चांगला लागतो. लहान मुलांचा हा आवडता पदार्थ असतो. शिवाय तो शिर्‍यातही चांगला लागतो. तेही नको असेल तर पोळ्यांच्या कणकेत टाकून त्याच्या पोळ्याही छान होतात.


_______________________________________________

 साधे चिकन  


साहित्य:- 
१.    १ कि.ग्र. चिकन
२.    १.५ चमचे लसणाची पेस्ट
३.    १ चमचा आल्याची पेस्ट
४.    अर्धा चमचा मिरची-कोथिंबिरीची पेस्ट
५.    दोन चमचे मसाला (रोजचा) किंवा तिखट
६.    पाव चमचा हळद
७.    २ मोठे चमचे किंवा डाव तेल
८.    १ चमचा मीठ
९.     सुके खोबरे भाजून बनविलेली पेस्ट
१०. पाऊण चमचा गरम मसाला (धणे, जिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, शाहजिरे,     दगडफुल, खसखस इ.) (काही कमी-जास्त असले तरी चालू शकेल.)

कृति:-
सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धूवून घ्यावे. चिकनला आल्याची पेस्ट, लसणाची अर्धी पेस्ट, मिरची-कोथिंबिरीची पेस्ट, मीठ, हळद, तिखट लावून अर्धा तास ठेवावे. नंतर पॅनमध्ये तेल सोडावे, त्यावर राहिलेली अर्धी लसणाची पेस्ट घालून परतावे, मग थोडेसे तिखट घालून(लाल रंग येण्यासाठी) लगेचच त्यावर चिकन घालावे. १ ते २ मिनिटे मोठ्या आचेवर परतावे. (त्यामुळे चिकनचा ऊग्र वास किंवा ओशटपणा कमी होतो.) त्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवावे.
-     जर सुके हवे चिकन हवे असेल तर अजिबात पाणी न टाकता फक्त वाफेवर मंद आच ठेऊन शिजवावे.
मधून मधून परतावे. साधारणत: २० ते २५ मिनिटात मंद आचेवर चिकन  शिजते. 
   चिकन शिजल्यावर त्यात सुक्या खोबर्‍याची पेस्ट घालावी, वरून गरम मसाला टाकून तो     नीट मिक्स करून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. सूके चिकन ग्रेव्ही चिकनपेक्षा जास्त चवि़ष्ट     असते.
-    ग्रेव्ही चिकनसाठी झाकणीतील पाणी चिकनमध्ये घालून रस्सा ठेवावा. साधारणत: १५ ते २०     मिनिटात चिकन शिजते. चिकन शिजल्यावर त्यात सुक्या खोबर्‍याची पेस्ट घालावी, वरून गरम     मसाला टाकून तो नीट मिक्स करून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.

_______________________________________________

ग्रीन चिकन
 

साहित्य:-
१.    १ कि.ग्र. चिकन
२.    १.५ चमचे लसणाची पेस्ट
३.    १ चमचा आल्याची पेस्ट
४.    ३ ते ४ मध्यम आकाराच्या मिरच्यांची पेस्ट
५.    अर्धी वाटी कोथिंबिरीची पेस्ट
६.     चिमू
भर हळद
७.    २ मोठे चमचे किंवा डाव तेल
८.    १ छोटा चमचा मिठ
९.     सुके खोबरे भाजून बनविलेली पेस्ट
१०    पाऊण चमचा गरम मसाला (धणे, जिरे, लवंग. दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, शाहजिरे,     दगडफुल, खसखस इ.) (काही कमी-जास्त असले तरी चालू शकेल.)
 

कृति:-
सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धूऊन घ्यावे. त्या चिकनला आल्याची पेस्ट, अर्धी लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, मिठ, हळद, लावून अर्धा तास ठेवावे. 
नंतर पॅनमध्ये तेल सोडावे, त्यावर राहिलेली अर्धी लसणाची पेस्ट घालून परतावे, मग त्यावर चिकन घालावे.
१ ते २ मिनिटे मोठ्या आचेवर परतावे. त्यावर झाकण ठेवून झाकणात पाणी ठेवावे. अजिबात पाणी न टाकता मंद आच ठेऊन फक्त वाफेवर शिजवावे. मधून मधून परतावे. साधारणत: २० ते २५ मिनिटात मंद आचेवर चिकन शिजते. वरून गरम मसाला टाकून तो नीट मिक्स करून दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.  त्यावर थोडी कोथिंबिरीची चिरुन टाकावी.
   ग्रीन चिकन झणझणीत नसले तरी त्याला एक वेगळी आणि खास चव लागते, ती नक्कीच आवडेल.   
________________________________________________

3 comments:

  1. hari om sangeeta
    wel done. these simple recipes are very imp to know. and most of our generation does not go for it bcoz we feel it difficult. but your blog seem to be very helpful in this way. thnks and waiting for more recipes
    hari om

    ReplyDelete
  2. mastch Sangeetaveera_ Gr8 Work & Gd Information

    ReplyDelete
  3. Aprateem Mahiti.....lage raho Sangeetaveera

    ReplyDelete